जळगाव प्रतिनिधी । येथील जिजामाता माध्यमिक विद्यालय आषाढी एकादशीनिमित्ताने दिंडी आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष बापू डी.एल.महाले व उपाध्यक्ष आप्पा आर.झेड.पाटील व शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खोरखेडे यांचे हस्ते श्रीविठुमाऊलीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दिंडीला सुरुवात करण्यात आली जसे मुकुंद नगर, नवरंग कॉलनी, हरिविठ्ठल नगर, व्यंकटेश नगर या परिसरातून काढण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन किशोर पाटील यांनी केले. याप्रसंगी लता इखनकर, आशा पाटील, संजय खैरनार, कृष्णा महाले, संगीता पाटील, विकास तायडे, शैलजा चौधरी, प्रशांत मडके, जगदीश शिंपी विद्यार्थी, पालक उपस्थित होते.