जिद्द आणि चिकाटी असेल तर यश हमखास – विलासराव पाटील 

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द व चिकाटी असेल तर यश हमखास मिळत, असे प्रतिपादन विलासराव पाटील यांनी केले. देवगांव देवळी येथे महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये दहावीचा निरोप समारंभावेळी ते बोलत होते.

शाळेच्या गुणवत्तेवर गावाची प्रगती कळत असते देवगांव देवळी सारख्या उपक्रमशील शाळेचा संस्थाचालक असल्याचा मला अभिमान आहे. शाळेतील शिक्षक इमानेइतबारे अध्यापनाचे कार्य करीत असतात व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्ह्यात शाळा उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक आहे. दहावीतील विद्यार्थ्यांनी येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यशसंपादन क देरून भविष्यात वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक करावा असे देवगांव देवळी येथे महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये दहावीचा निरोप समारंभ व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षीय भाषणातून संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील मार्गदर्शन करताना बोलत होते.

अगोदर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी प्रस्ताविक केले. संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील यांची अखिल भारतीय माळी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे शाल व श्रीफळ देऊन शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी सत्कार केला.

इयत्ता दहावीची विद्यार्थिनी वैशाली पाटील व यशस्वी पाटील यांनी स्वागत गीत सादर केले. इयत्ता दहावीची विद्यार्थिनी वैशाली पाटील हिने आपले मनोगत व्यक्त करत शाळेत झालेले संस्कार व शिक्षकांचे मार्गदर्शन आम्ही कधीच विसरू शकत नाही असे सांगितले.

इयत्ता दहावीची वर्ग शिक्षक आय .आर. महाजन यांच्या संकल्पनेतून दहावीतील एका विद्यार्थ्याला बेस्ट स्टुडंट अवार्ड 2021-22 देण्यात आला. इयत्ता दहावीतील यशस्वी प्रवीण पाटील या विद्यार्थ्यांची निवड लोकशाही पद्धतीने इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी केली. व तिला सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन संस्थेचे अध्यक्ष व मान्यवर यांनी सन्मान केला.

शाळेत 14 सप्टेंबर हिंदी दिनानिमित्त वकृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. 19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्ताने निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. शाळेत राष्ट्रभाषा पुणे यांच्या वतीने प्रबोध व सुबोध परीक्षा घेण्यात आल्या होत्या या सर्व परीक्षांचे सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. मागच्या वर्षी इयत्ता दहावीत प्रथम येणारा विद्यार्थी हर्षल माधवराव पाटील याला मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

डॉ शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या वतीने तापी गिरणा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार म्हणून शाळेचे शिक्षक ईश्वर रामदास महाजन यांना सन्मानित करण्यात आले त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील व शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन व शिक्षक वृंद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दहावीतील विद्यार्थ्यांनी शाळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा दिला. शाळेतील विद्यार्थिनीं यांनी वर्गशिक्षक आय. आर महाजन यांना भेट वस्तू देऊन सत्कार केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख आय .आर. महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन स्काउट शिक्षक एस के महाजन यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक एच.ओ.माळी, शाळेचे शिक्षकेत्तर कर्मचारी एन.जी देशमुख, संभाजी पाटील, गुरुदास पाटील यांनी प्रयत्न केले.

Protected Content