रांची (वृत्तसंस्था) झारखंड विधानसभेच्या मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर सुरूवातीच्या फेऱ्यानंतर कल काँग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चाच्या बाजूने दिसत आहे. तर भाजपा पिछाडीवर पडली आहे. सध्या काँग्रेस आघाडीला ३९, तर भाजपा ३१ जागांवर आघाडीवर आहे.
झारखंड विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू झाली. दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार असले तरी सुरूवातीच्या कलामध्ये भाजपा पिछाडीवर आहे. राज्यातील ८१ जागांसाठीच्या प्रचारात सत्ताधारी भाजप विरुद्ध झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीत सरळ सामना झाला. एकूण पाच टप्प्यात मतदान झाले. मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपला धक्का बसेल असा अंदाज वर्तवलेला होता. त्यानुसार भाजपा पिछाडीवर पडली आहे. सध्या काँग्रेस आघाडी ४०, तर भाजपा ३० जागांवर आघाडीवर आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन हे दोन्ही मतदारसंघातून आघाडीवर आहेत. ते दुमका आणि बरहाट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.