भारतीय बौध्द महासभा चोपडा शहर व तालुका कार्यकारिणीची निवड

chopda news 2

चोपडा प्रतिनिधी । भारतीय बौध्द महासभेची चोपडा शहर आणि तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात जिल्हाध्यक्ष शैलेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तालुका कार्यकारिणी निवड करण्यात आली. यावेळी समता सैनिक दल जिल्हाप्रमुख मेजर युवराज नरवाडे, जिल्हासंघटक व केंद्रियशिक्षक हितेंद्र मोरे, सुदाम करनकाळ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.

तालुका कार्यकारिणी याप्रमाणे
तालुकाध्यक्षपदी बापूराव वाणे, सरचिटणीस दिलीप सांळूखे, कोषाध्यक्ष रमेश सोनवणे, संघटक आधार संदानशिव, महेंद्र सोनवणे, उपाध्यक्ष भगवान वारडे, संस्कार उपाध्यक्ष सुदाम करनकाळ, समता सैनिकप्रमुख सुकदेव बाविस्कर, चोपडा शहर कार्यकारिणी शहराध्यक्ष भरत शिरसाठ, सरचिटणीस दिपक वानखेडे, कोषाध्यक्ष पूर्णानंद वारडे, उपाध्यक्ष जानकीराम सपकाळे, समता सैनिक प्रमुख भिमराव भालेराव यांची निवड करण्यात आली.

मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार
तालुका व शहर कार्यकारिणीचे मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देवून अभिनंदन करुन सत्कार करण्यांत आला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यांत आल्या. यावेळी शैलेंद्र जाधव, युवराज नरवाडे, सुदाम करनकाळ, आधार करंदीकर यांनी मनोगत व्यक्त केले. बैठक यशस्वीतेसाठी हितेंद्र मोरे, अशोक शिरसाठ, ओंकार जाधव, आधार संदानशिव, सुदाम अप्पा, आधार करंदीकर, सुदाम करनकाळ यांनी परिश्रम घेतले. प्रास्तविक व सुत्रसंचलन हितेंद्र मोरे यांनी केले.

Protected Content