Home Cities अमळनेर लग्न समारंभातून सव्वा दोन लाखांचे दागिने लांबविले

लग्न समारंभातून सव्वा दोन लाखांचे दागिने लांबविले


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील बन्सीलाल पॅलेस येथे महिलेच्या पर्समधून २ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची धक्कादायका घटना रविवारी २ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता घडली आहे. या संदर्भात मंगळवारी ४ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील तांबेपुरा परिसरात राहणाऱ्या लता प्रल्हाद भावसार वय-५३ यांच्या मुलाच्या लग्नाचा कार्यक्रम रविवारी २ मार्च रोजी अमळनेर शहरातील बन्सीलाल पॅलेस येथे ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात लता भावसार यांच्या पर्समध्ये ठेवलेले २ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना उघडकील्यानंतर महिलेने मंगळवारी ४ मार्च रोजी दुपारी ३ वाजता अमळनेर पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound