रेडक्रॉसमार्फत जेष्ठ नागरिकांसाठी जेष्ठ नागरिक श्रेष्ठ नागरिक मेळाव्याचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. सद्य परिस्थितीत समोर येणाऱ्या अनेक घटना या मनाला हेलावून टाकणाऱ्या आहेत. जेष्ठ नागरिकांचा एकटेपणा, मानसिक विटंबना, आरोग्यविषक अडचणी, सायबर क्राइम, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठीना कायद्यांची पूर्ण माहिती नसल्याने आर्थिक व्यवहारात येणाऱ्या अडचणी, परीवारांकडून होणारी हेळसांड, प्रॉपर्टीवर होणारा ताबा या सारख्या अनेक विषयांमुळे मानसिक त्रास वाढत आहे.

या सर्व अडचणींवर सर्व जेष्ठ नागरिकांना योग्य मार्गदर्शन मिळावे व त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे या उद्देश्याने इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जळगावच्या रेडक्रॉस सिनियर सिटीझन व समुपदेशन समिती मार्फत शहरातील जेष्ठ नागरिक श्रेष्ठ नागरिकांसाठी दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत कान्ताई हॉल, जळगाव येथे एक दिवसीय जेष्ठ नागरिक श्रेष्ठ नागरिक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्यात जेष्ठांसाठी आरोग्य, आहार, दैनंदिन जीवनशैली, कायदा, जेष्ठ नागरिकांसाठीच्या विविध शासकीय योजना, मनस्वास्थ्य, समुपदेशन इत्यादी विषयांवर तज्ञ मान्यवरांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

यासाठी सोबत जोडलेल्या कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे या सर्व विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी विविध विषयांचे तज्ञ मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यात जळगाव शहरातील विविध जेष्ठ नागरिक संघातील पदाधिकारी, सदस्य तसेच शहरातील इतर जेष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभणार आहे. सर्व ज्येष्ठ नागरिक श्रेष्ठ नागरिकांसाठी चहा, नाश्ता जेवणाची व्यवस्था हि करण्यात येणार आहे. तसेच सर्व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य किट भेट देण्यात येणार आहे. या उपक्रमाचे प्रायोजकत्व रतनलाल सी. बाफना फाउंडेशन ट्रस्ट यांनी स्वीकारले असून यासाठी जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे.

Protected Content