जळगाव प्रतिनिधी । जेसीआय जळगावतर्फे धनाजी नाना महाविद्यालयात पाच दिवसीय एंपॉवरिंग युथ ट्रेनिंग कार्यशाळेस प्रारंभ करण्यात आला आहे.
शहरातील धनाजी नाना महाविद्यालयात पाच दिवसीय कार्यशाळेस प्रारंभ करण्यात आला आहे. या कार्यशाळेत ट्रेनर धनंजय जकातदार हे उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रारंभी धनंजय जकातदार, प्राचार्य राजेंद्र वाघुळदे आणि जेसीआय जळगावचे अध्यक्ष प्रतीक शेठ यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले. यातील पहिल्या सत्रात इमोशनल मॅनेजमेंट, कौशल्य विकास व सकारात्मक विचारसरणी आदींबाबत विवेचन करण्यात आले.
याप्रसंगी प्रतीक शेठ यांच्यासह वरूण जैन, आबासाहेब पाटील, मोईन अहमद, प्रियंका भराटे, आनंद नागला, जयश्री पाटील, यशोधन पाटील आदींची उपस्थिती होती.