जळगाव प्रतिनिधी । जेसीआय जळगाव डायमंड सिटी आणि आयक्यू व्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावात नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
अभिनव सराव पाठशाला येथे हे शिबिर घेण्यात आले. यामध्ये ३५० पेक्षा जास्त विद्यार्थिनी व विद्यार्थी गरजूंनी लाभ घेतला आहे. यात डॉ दीपक पाटील यांनी नेत्र तपासणी केली. याप्रसंगी मुख्याध्यापक ललित नेमाडे, जेसीआय जळगाव डायमंड स्टिीचे अध्यक्ष जिनल जैन, सविता सोनार , हेमलता चौधरी , सुशील अग्रवाल , कमलेश अग्रवाल, योगेश करंदीकर, अशोक भंडारी , प्रशांत परिख , विजय सोनार आदी होते यानी परिश्रम घेतले प्रकल्प प्रमुख हेमलता चौधरी आदी उपस्थित होते.