चाळीसगाव प्रतिनिधी । येथील हिरापूर रोडवर असणार्या जिल्हा बँकेच्या शाखेत चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याचे आज सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, चाळीसगावच्या हिरापुर रोड वर असलेल्या डॉक्टर देशमुख यांच्या घरासमोरील जेडीसीसी बँकेच्या शाखेत रात्री काही अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. बँकेच्या शटरचे कुलूप तोडून बँकेची तिजोरी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असून ही तिजोरी बँकेच्या बाहेरच फेकून दिल्याचे दिसून येत आहे. सकाळी परिसरात घटना कळताच याठिकाणी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, यातून नेमकी किती रोकड लंपास करण्यात आली याची माहिती मिळालेली नाही.