धानोरा, ता. चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील गोलवाडे येथील रहिवासी जयवंताबाई यादव सावकारे यांचे आज निधन झाले.
जयवंताबाई यादव सावकारे यांनी आज मध्यरात्रीच्या सुमारास शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा. सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्या नारायण सावकारे यांच्या मातोश्री होत. त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी ११ वाजता गोलवाडे येथील राहत्या घरून निघणार आहे.