Home राजकीय ‘आमचे सरकार टिकणार नाही’ हे सांगण्यात भाजपची चार वर्षे जाणार- जयंत पाटील

‘आमचे सरकार टिकणार नाही’ हे सांगण्यात भाजपची चार वर्षे जाणार- जयंत पाटील

0
26

पुणे प्रतिनिधी । महाविकास आघाडी सरकार हे कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचे सांगत हे सरकार टिकणार नाही हे सांगत भाजपची पुढची चार वर्षे जाणार असल्याचा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मारला आहे.

भाजपतर्फे पुणे पदवीधर मतदारसंघासाठी संग्रामसिंह देशमुख यांनी अर्ज भरला असतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे सरकार आणखी काही वर्षे टिकणार नसल्याचे सांगत महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले होते. त्याला उत्तर देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, हे सरकार स्थिर आहे हे चंद्रकांत पाटलांनाही माहीत आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी हे सरकार दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ टिकणार नाही असे सांगितले होते, परंतु आता सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. उरलेली चार वर्षे हे सरकार पूर्ण करेल. हे सरकार टिकणार नाही असे सांगण्यातच भाजप आणि चंद्रकांत पाटलांची चार वर्षे जातील असा टोला त्यांनी लगावला.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news


Protected Content

Play sound