यावल प्रतिनिधी । येथील तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी माध्यमिक विद्यालय वड्रीचे मुख्याध्यापक जयंतइचौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मुख्याध्यापक संघाची तालुका कार्यकारणी ची निवड प्रक्रिया निवडणूक निरीक्षण जी आर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. उर्वरित कार्यकारणी पुढील प्रमाणेप्रमाणे- उपाध्यक्ष शे. अशपाक शे. याकूब (आयडियल उर्दू मारुळ), सचिव पदी सौ. निशा प्रमोद पाटील (मुलींचे विकास विद्यालय यावल) सदस्य म्हणून संजीव बोठे (घ.का.विद्यालयआमोदा),गिरीश पाटील (एल. एम. पाटील विद्यालय राजोरा) , उमाकांत महाजन (डि. के. विद्यालय डाभूर्णी) , शिवराम बी सोनवणे (प्रभात विद्यालय हिंगोणा),शावखा इब्राहिम तडवी (डि. एच जैन कोरपावली) यांची निवड करण्यात आली आहे.सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा देण्यात आल्या . याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी डि. व्ही. पाटील, व्ही जी तेली, बी पी पाटील, अलका इंगळे, सुनिता पाचपांडे यांच्यासह सह यावल तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते .सुत्रसंचालन फैजपुरचे गणेश गुरव यांनी केले तर उपस्थितांचे आभार व्ही एम राणे यांनी केले.