श्रीनगर : वृत्तसंस्था । जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आलं आहे. बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांकडून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) गस्त पथकावर हल्ला करण्यात आला. यामध्ये सीआरपीएफच्या ११७ बटालियनचे सहाय्यक उपनिरीक्षक नरेश उमराव बडोले जखमी झाले होते. उपचारादरम्यान ते शहीद झाले. नरेश बडोले मुळचे नागपूरचे होते.
बंदिपोरा परिसरात पहाटे साडे सात वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर गोळीबार केला. गोळीबारात नरेश बडोले गंभीर जखमी झाले होते. हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी नरेश बडोले यांची रायफल घेऊन घटनास्थळावरुन पळ काढला. नरेश बडोले यांना तात्काळ लष्कर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आलं. “दहशतवादी दुचाकीवरुन आले होते. सध्या संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे