Home क्राईम माफी न मागीतल्यास जावेद अख्तर यांना घरात घुसून मारू; करणी सेनेची धमकी

माफी न मागीतल्यास जावेद अख्तर यांना घरात घुसून मारू; करणी सेनेची धमकी


javed akhtar
 

मुंबई (वृत्तसंस्था) बुरख्यासोबतच घुंगटवरही बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या गीतकार जावेद अख्तर यांना महाराष्ट्र करणी सेनेने धमकी दिली आहे. तीन दिवसांत माफी मागा, नाहीतर तुम्हाला तुमच्या घरात घुसून मारू, अशी धमकी महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख जीवन सिंह सोलंकी यांनी दिली आहे.

 

 

गीतकार व पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी गुरुवारी बुरखा बंदीवर आपली भूमिका स्पष्ट केली होती. बुरख्यावर बंदी घालण्याबरोबरच राजस्थानमधील घुंगटप्रथेवरही बंदी घालावी, महिला सक्षमीकरणासाठी ते आवश्यक आहे, असे जावेद अख्तर यांनी म्हटले होते. बुरख्यावर बंदी घालण्याला आपला कोणताही आक्षेप नसून, केंद्र सरकारने राजस्थानात होत असलेल्या 6 मेच्या मतदानापूर्वी घुंगट प्रथेवरही बंदी घालावी, असे वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. मात्र, आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचे स्पष्टीकरण देत अख्तर यांनी दोन्हींवर बंदी घालण्याचे मत व्यक्त केले होते.

 

यावर महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख जीवन सिंह सोलंकी यांनी ‘तीन दिवसांत माफी मागा, नाहीतर तुम्हाला तुमच्या घरात घुसून मारू’ अशी धमकी जावेद अख्तर यांना दिली आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ देखील करणी सेनेने पोस्ट केला आहे. ‘आपल्या मर्यादा ओळखा. राजस्थान राज्याच्या संस्कृतीवर प्रश्न उपस्थित करू नका. जावेद अख्तर यांनी त्यांच्या वक्तव्यासाठी तीन दिवसांत माफी मागावी, अन्यथा करणी सेनेच्या विरोधाला सामोरे जा’ असे या व्हिडीओत म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound