यावल प्रतिनिधी । कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ओढवलेल्या महामारीच्या प्रादुर्भाव लक्षात घेता सुमारे शंभर वर्षाची धार्मिक परंपरा असलेल्या येथील मुस्लीम बांधवांची जशने ए-पेहरन शरीफ ढोली उत्सवाची शहरातून काढण्यात येणाऱ्या मिरवणूकीचे संपुर्ण कार्यक्रम रद्द करण्यात आलेत व कुठलेही वाद्य न लावता डोलीची जागेवरच पुजा ( दुआ ) अशा प्रकारे धार्मिक विधी करीत जागतीक शांततेसह कोरोना विषाणु रोगाचे समुळ उच्चाटनासाठी खिरनी पुरा पंच कमीटीच्या वतीने प्रार्थना करण्यात आली.
दरम्यान येथे पेहरन उत्सव महाराष्ट्रात राज्यात एकमेव यावल येथेच साजरा होत असतो. त्यामुळे या उत्सवाला अधिक महत्व असल्याची मुस्लीम बांधवांची भावना आहे. सालाबाद फिरत्या पद्धतीने दरवर्षी हा पहेरहन शरीफ उत्सव मोठया उत्साहाने साजरा होतो आणि त्यासाठी राज्यासह इतर ठीकाणाहुन हजारोच्या संख्येने मुस्लीम बांधव पेहरनच्या ढोली दर्शनासाठी येतात, मात्र या वर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्श्वभुमीवर यंदा येथील डांगुपरा भागातील फैजोद्दीन ताजोद्दीन (सोल्जर मीस्त्री) यांचे निवासस्थानातून दरवर्षी पारंपारीक पद्धतीने डोलीची मिरवणूक काढली जाते.
या वेळेस अगदी साद्या पध्दतीने त्यांच्या निवासस्थानी उत्सव समीतीचे सैय्यद युनुस सैय्यद युसुफ, गुलाम रसुल हाजी गुलाम दस्तगीर, हाजी इकबाल खान, कमरुद्यिन शेख, शेख इस्हाक शेख ईब्राहीम ,हाजी गफफार शाह, भुरा शाह, आदि पंच कमीटीने पुजा ( दुआ ) करून पवित्र ढोलीची जियारत करीत दर्शन घेतले. पोलीस निरिक्षक अवतारसींग चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक जितेंद्र खैरनार, पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले, व पोलीस सहकारी व गृहरक्षक दलाचे पुरूष व महीला कर्मचारी यांनी अतिशय चोख बंदोबस्त राखला. दरवर्षी पेहरन उत्सावाचे दुसरे दिवशी भारवण्यात येत असलेला कुस्त्याचा फड या वर्षी होणार नसल्याचे पंच कमीीच्या वतीने सांगण्यात आले.