जलजागृती सप्ताहानिमित्त शहरात जलदिंडी उत्साहात ( व्हिडीओ )

jaldindi

जळगाव प्रतिनिधी । शासनामार्फत जलजागृती अभियान संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक 16 ते 22 मार्च, 2019 या दरम्यान लोकांच्या सहभागाने संपन्न होत आहे. या निमित्ताने जलजागृती अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. डॉ. अविनाश ढाकणे यांच्याहस्ते सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक उपस्थित होते.

महाकलशाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुजन
जलजागृती अभियानाच्या जिल्ह्यातील कार्यक्रमाची सुरुवात जलदिंडीने बाबा झुलेलाल मंदीर, सेवा मंडळ, सिंधी कॉलनी येथून करण्यात आले. सकाळी 8 वाजता मंगल वाद्याच्या सुरात सिंधी कॉलनी, संत कंवरराम नगर येथून जलदिंडीस प्रारंभ होऊन पंचमुखी हनुमान मंदिर, इंडिया गॅरेज, स्वातंत्र्य चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात येथे पोहोचल्यानंतर जलदिंडी मधील कलशांचे एकत्रीकरण करुन (5 नद्यांचे पाणी) महाकलशाचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचे हस्ते पुजन करण्यात आले. या जलदिंडीमध्ये शहरातील विविध शाळांचे 500 विद्यार्थी व राज्य शासनाचे 300 अधिकारी, कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.

 

Add Comment

Protected Content