जनार्दन महाराजांनी रक्तदान करून साजरा केला अवतरण दिन

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रक्तदान करून पूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांनी २८ ऑगस्ट त्यांचा अवतरण दिन (वाढदिवस) साजरा केला आहे. यावेळी स्वतः महाराजांसह 43 जणांनी रक्तदान केले.

आपण किती जगलो आणि कसे जगलो, काय कमवले आणि काय गमवले याचे चिंतन करण्याचा दिवस म्हणजेच आपला वाढदिवस. गेल्या ४४ वर्षात देव, देश आणि धर्म यासाठी मी केलेले कार्य, त्यातून मिळालेले मला समाधान याचे चिंतन करण्याचा आज हा माझा दिवस. असे महत्त्वपूर्ण संदेश महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांनी दिला. मी आतापर्यंत जे जीवन जगले त्यात मला पूर्णपणे समाधान आहे असेही त्यांनी सांगितले.

यानिमित्त आज दिवसभर सतपंथ संस्थान मंदिरात डॉक्टर, प्राध्यापक, शासकीय व निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, राजकारणी, समाजसेवक यांचे सह शेकडो भक्तांनी महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांना शुभेच्छा दिल्या. एकदम साध्या पद्धतीने रक्तदान करून त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. यात आज सकाळी घट पूजा करून त्यानंतर सतपंथ चारीटेबल ट्रस्टच्या सहकार्याने संजीवनी ब्लड बँकेने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यात स्वतः महाराजांनी रक्तदान केले यात जवळपास 43 जणांनी रक्तदान केले.

महानुभाव पंथाचे सुरेशराव मानेकर बाबा शास्त्री, स्वामीनारायण पंथाचे शास्त्री भक्ती किशोर दासजी, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. धनराज महाराज अंजाळेकर, हभप सुनील महाराज नशिराबाद, राजूभाऊ सुरत, भरतदासजी महाराज, गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट जामनेरचे परमपूज्य श्याम चैतन्य जी महाराज, खंडोबा देवस्थानचे राम मोहनदास महाराज, खासदार रक्षा खडसे, अनिल चौधरी भुसावळ, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, एपीआय सिद्धेश्वर आखेगावकर, यावलचे न्यायाधीश एम. एस. वनचरे, भालोद येथील लीलाधर शेठ चौधरी, प्राचार्य पी. आर. चौधरी, प्राचार्य व्ही. आर. चौधरी, विविध वृत्तपत्रांचे संपादक, पत्रकार यासह अनेकांनी भ्रमणध्वनी द्वारे महाराजांना शुभेच्छा दिल्या.

 

Protected Content