धरणगाव प्रतिनिधी । आजादी का अमृत महोत्सव या संकल्पने अंतर्गत आज (दि.२) सकाळी ९ ते ११ या वेळेत कायदेविषयक जनजागृती करिता वकील संघ व न्यायालयीन कर्मचारी अशी संयुक्त मोटार सायकलव्दारे अखिल भारतीय जनजागृती अभियान रॅली न्यायालयातून काढण्यात आली.
यावेळी सर्व वकील सदस्यांनी व न्यायालयीन कर्मचारी या रॅलीमध्ये हजर राहिले. तसेच धरणगाव वकील संघाचे उपाध्यक्ष अँड.संदीप सुतारे, सचिव शरद माळी, सहसचिव महेंद्र चौधरी व इतर सदस्य अँड, वसंतराव भोलाने, अँड. संजय महाजन, अँड.संदीप पाटिल, अँड कैलास मराठे, अँड इस्राइल,अँड विक्रम परिहार,अँड.आर.एस.शिंदे,अँड गिरिश कटयारे, अँड आशिष बाचपाई, अँड.कुलदीप, अँड प्रशांत क्षेत्रीय व इतर सदस्य उपस्थितीत होते.