जामनेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्याचे पुनर्वसन मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते ना.अनिल भाईदास पाटील हे आज दुपारी पहूर येथे आले असता त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अजितदादा गटाचे नेते बंगालसिंह चितोडिया, भास्कर पाटील,जिल्ह्याचे युवा नेते अरविंद चितोडिया, किरण पाटील, नाना पाटील, प्रफुल लोढ़ा,मधुकर शिंदे, नरेंद्र जंजाळ ,शैलेश पाटील, अरविंद तायडे, विकास नाईक, पंडित नाईक, अभय सिंह राठोड यांचेसह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मंत्री ना. अनिल पाटील यांनी जामनेर तालुक्यात शासनाच्या वतीने जी काही मदत लागेल ती संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. रगरीब लोकांपर्यंत तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन शासकीय योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.