जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील इंद्राबाई ललवाणी प्राथमिक विद्या मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्यांनी विठुरायाचे भक्ती गीतावर नृत्य करत शहरातून वृक्षदिंडी काढली.
दिंडी सोहळ्यामध्ये चिमुकले हे वारकरीच्या वेशभूषेमध्ये पाहायला मिळाले. यावेळी चिमुकल्यांना शाळेच्या वतीने फळ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका शारदा महाजन, शिक्षक प्रकाश पाटील, संजय साळुंखे, मोहन पाटील, शरद महाजन, किरण महाजन, राकेश महाजन, स्वाती महाजन, वैशाली राजपूत, सरला धंनदडे आदींनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.