जामनेर प्रतिनिधी | गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारी आजारामुळे शाळा बंद होत्या. दि. १ डिसेंबर रोजी शासनाने आदेशाचे पालन करून शाळा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार जामनेर शहरातील वेगवेगळ्या शाळांमध्ये पहिली ते सातवीचे वर्ग सर्व नियमांचे पालन करू सुरू करण्यात आले.
जामनेर शहरातील इंदिरा बाई लालवानी या शाळेमध्ये पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी शाळेतर्फे कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यात आले. यावेळी शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना तोंडाला मार्क्स घातल्याशिवाय प्रवेश करू नये, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच शाळेत प्रवेश करताना टेंपरेचर चेक करण्यात आले असून सॅनिटायझर देण्यात आले. यावेळी शाळेतर्फे प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेमध्ये नियोजन करून एका वर्गात फक्त पंधरा ते वीस विद्यार्थ्यांना बसवण्यात आले होते. यावेळी पहिली ते चौथीच्या विद्यार्थी पहिल्यांदाच शाळेत आल्या असल्यामुळे त्यांचे शाळेतर्फे फुल देऊन स्वागत करण्यात आले.
जामनेर शहरातील न्यू इंग्लिश स्कूल स्कूल शाळेमध्ये सकाळी आठ वाजता गेटवर विद्यार्थ्यांचे स्वागत रांगोळी काढून करण्यात आले होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत होते. त्याच बरोबर सर्व विद्यार्थ्यांना यावेळी करुणा आजाराचा पार्श्वभूमीवर नियमाचे पालन करत बंधनकारक करण्यात आले. त्याचबरोबर वर्गामध्ये बसतांना बैठक व्यवस्थेत एका बेंचवर एकच त्याला बसविण्यात आले होते. अशाप्रकारे जर शाळेने कोरोना आजाराचा पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून नियोजन केले तर विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारे आजाराचा प्रादुर्भाव येणार नसून नेहमी अशाच प्रकारे शाळेने काळजी घेतली पाहिजे, असे मत पालक वर्गातून व्यक्त होत आहे.