जामनेर प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाच्या जामनेर तालुक्याची सोशल मीडिया सेलची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यात तालुकाध्यक्षपदी तुषार चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जीएम हॉस्पीटलच्या सभागृहात भाजपच्या सोशल मीडिया सेलची तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. याप्रसंगी माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, सोशल मीडिया प्रांत सह संयोजक अमित साळुंखे, जिल्हा चिटणीस नवल पाटील, सरचिटणीस आनंदा लाव्हरे, रविंद्र झाल्टे, पाणी पुरवठा सभापती अतिष झाल्टे, निलेश चव्हाण,सुभाष पवार,मयुर पाटील ,प्रफुल्ल महाजन यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. महाजन यांनी सांगितले की, माझ्यासारखा सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता भारतीय जनता पक्षा मुळे ६वेडेस आमदार म्हणून निवडून आला है फक्त पक्षामुळेच शक्य झाले आहे. पक्षाने मला भरभरून दिल आहे.त्यामुळे प्रामाणिक पणे काम केल्यास भविष्यात आपल्याला पक्ष योग्य तो न्याय देईल असा विश्वास यावेळी गिरीश भाऊ महाजन यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.
याप्रसंगी सोशल मीडिया तालुका अध्यक्षपदी तुषार चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्यकारिणी पुढील प्रमाणे:-विलास हिवराळे,ओम खुरपडे,गणेश चौधरी,प्रतीक पाटील ,शेख अहेसान,अक्षय पाटील,चेतन अनिल पाटील, निलेश सिसोदे,स्वप्नील जोशी,सतीश सोनार,दिपक दुबे विनोद पाटील सर्व उपाध्यक्ष,किरण तेली चिटणीस अविनाश मराठे,गणेश केने,सुधाकर गोसावी,वेदांत कुलकर्णी अरबाज खालील भांजा, सदस्य सचिन थोरात,नाना माळी,आदींची यावेळी कार्यकारणीत निवड करून आ गिरीश महाजन यांच्या हस्ते नियुक्ती पत्रक वाटप करण्यात आले.