जामनेर प्रतिनिधी | येथे शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधनचे औचित्य साधून कोरोना योध्द्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
जामनेर तालुका शिवसेना,युवासेना व महिला आघाडीच्या वतीने आयोजित रक्षाबंधन सोहळा डॉ.उज्वला मनोहर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तर शिवसेना जळगाव जिल्हा महिला आघाडी प्रमुख पुनम बर्हाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरे करण्यात आले.
या कार्यक्रमात कोरोना काळात काम केलेल्या महिला डॉक्टर्स,आशा सेविका, पोलिस पाटील,अंगणवाडी सेविका,मदतणीस या महिलांना कोरोना योध्दा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तर, महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी अल्का देवरे (सार्वे) आणि माया पाटील (जंगीपुरा) यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
माता भगिनींनी केव्हाही संपर्क साधा शिवसेना तुमच्यासाठी खंबीरपणे तुमच्या सोबत उभी असेन असे प्रास्ताविकात युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजितराजे मनोहर पाटील यांनी सांगितले. यावेळी सोनाली सावकारे ह्या युवतीने आणि अल्का देवरे यांनी गीत सादर केले आणि जिल्हाप्रमुख पुनम बर्हाटे यांनी महिला सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन करत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.सुत्रसंचालन तेजश्री अशोक शिंपी यांनी केले तर आभार निशा भावराव पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचा शेवट युवा उपजिल्हाप्रमुख विश्वजितराजे मनोहर पाटील यांना आलेल्या महिलांनी राखी बांधून केला.
या कार्यक्रमाला जि.प.सदस्या सुरेखाताई कोळी, डॉ.प्रियांका पाटील, डॉ.स्वाति पाटील, डॉ.विजया पाटील,सुनसगाव ग्रा.पं.सरपंच वैशाली विजय पाटील, परिसरातील महिला ग्रा.पं.सदस्या सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.