Home क्राईम शाळेची मालमत्ता परस्पर विक्री केल्याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा

शाळेची मालमत्ता परस्पर विक्री केल्याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा


crime bedya

जामनेर (प्रतिनिधी)। येथील न्यु इंग्लिश शाळेची मालमत्ता परस्पर विक्री केल्याप्रकरणी मुख्याध्यापकासह नऊ जणांवर जामनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार संस्थेचे सचिव सुरेश धारीवाल यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन शाळेचे मुख्याध्यापक भीमराव चौधरी,पी. एन.नरवाडे, अरुण महाजन, व्ही.डी.पाटील, ए.बी.चौधरी, ए.पी. पाचपोळ, के.बी.पाटील, पी.बी.पालवे, एस.एस.शिरसाठ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे करीत आहेत.


Protected Content

Play sound