जामनेर, प्रतिनिधी । तालुक्यातील गारखेडा बुद्रुक येथील एका घराला लागलेल्या भीषण आगीत पती-पत्नीचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली असून यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
तालुक्यातील गारखेडा बुद्रुक येथील पती-पत्नीचा काल रात्री मध्यरात्री नंतरच्या दरम्यान घरात आग लागून दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. गारखेडा येथील मजुरी करणारे उत्तम श्रावण चौधरी (वय ४५) व त्यांच्या पत्नी वैशाली उत्तम(वय ४०) हे घरात घरात झोपलेले असताना काल दिनांक १० च्या मध्यरात्री नंतरच्या वेळे दरम्यान घरात मोठ्या प्रमाणात आग लागली.
ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती समोर आली नाही. मात्र क्षणार्धात घराच्या आगीच्या ज्वाला बाहेर पडल्याने परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. बर्याच प्रयत्नांनी आग विझली. मात्र या आगीत उत्तम श्रावण चौधरी (वय ४५) व त्यांच्या पत्नी वैशाली उत्तम(वय ४०) यांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीत चौधरी कुंटुबीयाच्या संसाराची राख रांगोळी झाली असून घटनेचा पोलीस पंचनामा करण्यात आला आहे.
दरम्यान, आगीत चौधरी दाम्पत्याचा मृत्यू झाल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.