जामनेर प्रतिनिधी । माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने येथे ग्लोबल महाराष्ट्र मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल उभारण्यात आले असून याचे १३ रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे.
जामनेर तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या अत्याधुनिक सेवा सुविधांनी ग्लोबल महाराष्ट्र मल्टीपर्पज हॉस्पिटल रूग्णसेवेसाठी सज्ज झाले आहे. येत्या १३ तारखेला माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रुग्णालयाचे लोकार्पण केले जाणार आहे. जामनेर मधील या अतिभव्य सुसज्ज अत्याधुनिक हॉस्पिटलची रुग्णांच्या सेवेसाठी सर्व सेवासुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या असून शासकीय योजना देखील या ठिकाणी सर्व गरीब आणि गरजू रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आल्या असून आता जळगाव नाशिक पुणे मुंबई कुठेही उपचारासाठी जाण्याची गरज नाही अशी माहिती माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
खालील व्हिडीओत पहा या हॉस्पीटलमधील सुविधांची माहिती
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/350908709662264