जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील नेरी येथे ट्रकच्या चाकाखाली दुचाकी आल्याने वाघरी येथील बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना आज सकाळी घडली.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील वाघारी येथील रहिवासी असणारे शेख रशीद शेख कालू (वय ६५) हे त्यांचा मुलगा आबीद शेख रशीद (वय २५) याच्या सोबत एमएच १९ : डीएल-४४६५ क्रमांकाच्या दुचाकीवरून नेरी येथील बाजारासाठी आले होते. दरम्यान, नेरी येथे जळगावकडे जाणार्या जीजे १५ :यूयू- १७२६ क्रमांकाच्या ट्रकच्या मागील चाकात त्यांची दुचाकी आली. यामुळे या पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, शेख रशीद शेख कालू व त्यांचा मुलगा आबीद शेख रशीद यांच्या मृत्यूने वाघारी गावावर शोककळा पसरली आहे.