Home आरोग्य जामनेरात गटारी व नालेसफाईच्या कामांना सुरूवात

जामनेरात गटारी व नालेसफाईच्या कामांना सुरूवात

jamner news
jamner news


jamner news

जामनेर (प्रतिनिधी)। पावसाळा सुरु होताच शहरातील नाले, मोठमोठ्या गटारींच्या साफसफाई मोहिमेसाठी नगरपालिकेने पुढाकार घेत कामाला सुरुवात केली आहे. नगराध्यक्षा साधना महाजन, मुख्याधिकारी राहुल पाटील, उपनगराध्यक्ष अनिस शेख, जितेंद्र पाटील, आरोग्य सभापती बाबुराव हिवराळे, यांनी स्वत: अधिकाऱ्यांसमवेत विविध भागात पाहणी करून सफाई कर्मचार्‍यांना सूचना केली.

यावेळी आरोग्य विभागाचे रमेश हिरे, दत्तू जोहरे, वसंता माळी, देवानंद सुरवाडे उपस्थित होते. शहरातील वाकी रोड, पाचोरा रोड, भुसावळ रोड, जळगाव रोड, बोदवड रोड, बिस्मिल्ला नगर, गलाटी नाला, घरकुल परिसर, बस स्टेशन, आधी भागांमधील मोठी नाले व गटारी मध्ये पावसाळ्याच्या दिवसात साचलेल्या कचऱ्यामुळे पुढे पाणी जाण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने नाले व गटारींचा सफाईसाठी कर्मचाऱ्यांच्या व जेसीबीच्या साह्याने कचरा, जमलेला गाळ, काढण्याचे काम युद्ध पातळीवरन सुरू करण्यात आले.


Protected Content

Play sound