जामनेर प्रतिनिधी । माजी मंत्री आ. गिरीश महाजन MLA Girish Mahajan हे कोरोनाबाधीत झाल्यावर होम क्वॉरंटाईन होते. मात्र आता ते शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल होणार असल्याची माहिती त्यांनी जाहीर केली आहे.
माजी जलसंपदा मंत्री तथा आमदार गिरीश महाजन हे काही दिवसांपूर्वीच कोरोना बाधीत झाले होते. होम क्वॉरंटाईन राहून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे आता ते रूग्णालयात दाखल होणार आहेत. विशेष बाब म्हणजे यासाठी त्यांनी खासगी ऐवजी शासकीय रूग्णालयाची निवड केली आहे.
आ. गिरीश महाजन MLA Girish Mahajan हे मुंबई येथील सेंट जॉर्ज या शासकीय रूग्णालयात उपचार घेणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. यामुळे आता ते लवकरच सेंट जॉर्ज रूग्णालयात उपचारासाठी दाखल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दोन दिवसांपूर्वी ताप आल्यानंतर कोरोणा चाचणी केली असता, मला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच क्वारंटाईन होऊन उपचार घेत होतो. पुढील उपचारासाठी लवकरच मुंबई येथील सेंट जॉर्ज शासकीय रुग्णालयात दाखल होत आहे.
— Girish Mahajan (@girishdmahajan) March 18, 2021