जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातल्या मराठा समाजातील रत्नांचा सन्मान करण्याचा संकल्प मराठा महासंघाच्या बैठकीत करण्यात आला.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जामनेर तालुका स्तरीय बैठक जिल्हा उपाध्यक्ष अतुल सोनवणे व तालुकाध्यक्ष राहुल चव्हाण यांच्या उपस्थितीत सोमेश्वर महादेव मंदिर सोनबर्डी या ठिकाणी पार पडली. यावेळी समाजातील विविध विषयांवर चिंतन करण्यात आले. या बैठकीत जामनेर तालुक्यातील मराठा समाजाचे – मराठा समाजासाठी जामनेर तालुका म्हणून सामाजिक कार्यालय व सभागृह उभारण्यात यावे. याबद्दल सर्वानुमते तालुकास्तरीय संकल्प करण्यात आला.
यासोबत, मराठा समाजातील दुर्बल, निराधार घटकांचा शोध घेऊन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे मनोधैर्य वाढावे व समाजाने या घटकांची दखल घ्यावी या कारणास्तव अखिल भारतीय मराठा महासंघामार्फत या कार्यक्रमांची योजना निश्चित झालेली आहे. तसेच, समाजातील सामाजिक,शैक्षणिक, धार्मिक, राजकीय, औद्योगिक व शासकीय क्षेत्रातील मराठा समाजामध्ये नावलौकिक झालेल्या व समाजाची उंची डौलाने उंचावणार्या समाज रत्नांचा यथोचित सन्मान अखिल भारतीय मराठा महासंघ जामनेर तालुक्याच्या वतीने करण्यात येणार आहे असे आजच्या तालुका बैठकीत सर्वानुमते निश्चित करण्यात आलेले आहे.
या बैठकीला अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष- विनोद पाटील, संजय सपकाळ- सरचिटणीस, विजय पाटील-सरचिटणीस, संतोष चिंचोले-कार्याध्यक्ष, अशोक पाटील-युवक अध्यक्ष .नवल पाटील-कोषाध्यक्ष, ज्ञानेश्वर पाटील-शेतकरी, रमेश पाटील-चिटणीस
सागर पाटील- युवक उपाध्यक्ष, दिपक पाटील- शहर अध्यक्ष मयुर पाटील- युवा सचिव
निखिल खंडारे- शहर युवा उपाध्यक्ष दशरथ पाटील- युवा कार्याध्यक्ष मंगेश इंगळे,विशाल सपकाळ, आदि मराठा महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.