जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील एका व्यावसायिकाकडून दोन लाख ९५ हजार रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
शहरातील ओम शांतीनगर मध्ये राहणार्या नितीन सुरेशचंद सुराणा यांच्या घरातून सुमारे दोन लाख ९५ हजाराचा गुटखा जप्त करण्यात आला असून ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पथक जळगाव यांनी यांनी केली आहे.
आज गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक नजन- पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा जळगावच्या पथकाने जामनेर शहरातील ओम शांती नगर मध्ये राहणारा नितीन सुराणा यांच्या घरावर छापा टाकला. यात घरात दोन लाख ९५ हजार रुपये किमतीचा अवैध गुटखा सापडून आला आहे.
याबाबत नितीन सुरेशचंद सुराणा यांच्याविरुद्ध २७२, २७३, ३२८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा उपनिरीक्षक अमोल देवडे भगवान पाटील नंदलाल पाटील, उपाली खरे व भारत पाटील यांच्या पथकाने केली आहे.