जामनेर प्रतिनिधी | शहरातील बालिकेचा विनयभंग झाल्यानंतर निर्माण झालेल्या तणावात पोलिसांवर दगडफेक करणार्या तिघा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते फरार झाले आहेत.
या संदर्भात वृत्त असे की, जामनेर येथील जुन्या बोदवड रोडवरील घरकुलातील रहिवासी हाफिस बेग मेहमूद बेग वृद्धाने सहा वर्षीय बालिकेचा विनयभंग केला होता. त्यास घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या वाहनावर सलीम करीम बागवान, कैफ शेख रफिक व शाहरूख शेख साहेबू बागवान यांच्यासह काहींनी दगडफेक केली होती. यात चार पोलिस जखमी झाले होते. तर वाहनाची काचही फुटली आहे. दगडफेकीचे एका कर्मचार्याने व्हिडिओ चित्रण केले आहे. त्याच व्हिडिओ चित्रणावरून या तिघांची ओळख पटली असून त्यांच्याविरुद्ध जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते तिघेही फरार आहेत.
दरम्यान, विनयभंग प्रकरणी पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी आपल्या सहकार्यांनी घरकुलाच्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला. या वेळी पोलिस कॉन्स्टेबल सुनील माळी, तुषार पाटील, नीलेश घुगे, अमोल वंजारी, चालक शाम काळे उपस्थित होते.