जामनेर(प्रतिनिधी) महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या माहामानवांच्या जयंतीनिमित्त जामनेर शहरातील श्री लीला हॉस्पिटल, समता सैनिक दल, मराठा सेवा संघ, शहर मेडिकल प्रँक्टीशनर असोसिएशन व इतर काही सामाजिक संघटना यांनी महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
जामनेर नगराध्यक्षा साधना महाजन यांनी महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ११३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे आयोजन श्री लीला हॉस्पिटलचे संचालक डॉ. उमाकांत पाटील, डॉ घनश्याम पाटील, डॉ. वृषाली पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबवून महामानवानां अभिवादन केले. यावेळी आत्मा समितीचे जितू पाटील, नगरसेवक डॉ.प्रशांत भोंडे, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक निलेश चव्हाण यांनी तर आभार विनोद पाटील यांनी मानले. दीपक धोनी, प्रदीप गायके, मिलिंद लोंखंडे यांनी मनोगत व्यक्त केले. यशस्वीतेसाठी विविध सामाजिक संघटना पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.