जळगाव प्रतिनिधी । लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे ५० लाखाच्या अपसंपदा प्रकरणी अटक करण्यात आलेले ग.स. सोसायटीचे माजी अध्यक्ष सुनील सूर्यवंशी आणि विभागीय अधिकारी किरण पाटील यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज दोघांना न्यायालयात हजर केले असता न्या. डी.एस. पांडे यांनी जामिनावर कामकाज झाले. उद्या जामिनावर कामकाज होणार आहे.
ग.स.सोसायटीचे माजी अध्यक्ष सुनील सूर्यवंशी आणि किरण पाटील यांना न्यायालयात हजर केले. यावेळी दोन्ही संशयित आरोपींच्या वकीलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. यावर जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके यांनी आक्षेत घेत दोन्ही संशयित आरोपी तपासात मदत व सहकार्य करत नसल्याने पोलीस कोठडीत वाढ व्हावी, यांचा जामिन नामंजूर करावा अशी मागणी करण्यात आली. यावर न्या. डी.एस.पांडे यांनी याप्रकरणीचे कामकाज उद्या सुनावणी होणार असल्याचे सांगितले. न्यायालयीन कामकाजात संशयित आरोपी सुनील सूर्यवंशीतर्फे ॲड. साखर चित्रे तर दुसरे संशयित आरोपी किरण अभिमन पाटील यांच्यातर्फे ॲड. प्रकाश पाटील तर सरकारच्या वतीने सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके हे काम पाहत आहे.