जळगाव प्रतिनिधी | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते जमील देशपांडे यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे.
जमील देशपांडे हे मनसेत पहिल्यापासून सक्रीय आहेत. त्यांनी आधी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तसेच राज्य सरचिटणीसपदाची जबाबदारी देखील समर्थपणे पार पाडलेली आहे. तर जळगाव शहरासह जिल्ह्यात मराठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरणाची एक अतिशय परिणामकारक चळवळ सुरू केलेली आहे.
दरम्यान, आज जमील देशपांडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. याप्रसंगी ठाकरे यांनी त्यांना जिल्हाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र प्रदान केले. या अनुषंगाने आता देशपांडे यांच्यावर जळगाव शहर, जामनेर, मुक्ताईनगर आणि भुसावळ या मतदारसंघांची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे समाजाच्या सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.