जलसंधारणासाठी संस्कृती फाउंडेशन राबविणार “नदी पुनर्जीवन प्रकल्प”

download 2

भुसावळ प्रतिनिधी । शहराच्या अवती भोवती असलेल्या नद्यांमध्ये कचऱ्याचे प्रमाण वाढल्याने त्यात खोली राहली नाही तसेच मातीने पूर्ण भरून गेल्याने नद्यांनी रस्त्याचे रुप घेतले आहे. त्यामुळे नद्यांमध्ये पावसाळ्यात पाणी वाहने अवघड जाते. अश्या नद्यांचा पाण्याचा प्रवाह सुरळीत राहो ह्यासाठी संस्कृती फाउंडेशनतर्फे श्रमदानातून खोलीकरण करून त्यातील कचरा तसेच माती काढून त्यात दगड मातीचे बांध बांधण्यात येणार आहे. ह्यासाठी 12 मे रविवारी सुट्टीच्या दिवशी सकाळी ७ वाजेपासून तर ११ वाजेपर्यंत श्रमदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्कृती फाउंडेशनचे अध्यक्ष रणजितसिंग राजपूत यांनी कळविले आहे.

यंदाचे पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन तसेच दुष्कावर मात करून पाणीटंचाईचे संकट निवारण्यासाठी व पावसाचे पाणी जमीनीत जिरविण्यासाठी संस्कृती फाउंडेशन तर्फे शहराच्या अवती भोवती असलेल्या नद्यांना पुनर्जीवित करण्यात येणार आहे. ह्यात दर रविवारी शहराच्या नद्यांना पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे व पावसाळ्यात अश्या नद्यांच्या अवती भोवती वृक्षारोपण केले जाणार आहे. ह्यासाठी पहिल्या टप्प्यात कार्य १२ मे रविवार पासून संपन्न होणार आहे. ह्यात भुसावळ जामनेर रोडवरील चोरवड जवळ असलेल्या नदीचे खोलीकरण केले जाणार आहे ह्यासाठी जेसीबी यंत्रणा शहीद भगतसिंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश रायपूरे ह्यांच्याकडून मिळत आहे. यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने जलसंधारणाला प्राधान्य दिले पाहिजे, हा विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी फाउंडेशन ने सोशल नेटवर्किंग साईटची मदत घेतली आहे जास्तीत जास्त लोकसहभाग वाढावा ह्यासाठी प्रयत्न केले जात आहे. सेवाभावी तत्वावर जेसीबी, ट्रॅक्टरसह यंत्रसामग्री उपलब्ध व्हावी ह्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

निसर्गाचे आपण काही देने लागतो, या भावनेतून हे कार्य संपन्न होणात आहे आपला सुटीचा दिवस सत्कारणी लागावा ह्या जास्तीत जास्त संख्येने संस्थेसोबत श्रमदानासाठी यावे नागरिकांना ह्या कार्यासाठी श्रमदानासाठी पुढाकार घ्यावा व दि. १२ मे रविवार रोजी जामनेर रोड चोरवड जवळ होणाऱ्या नदीवर श्रमदानासाठी स्वयंस्फूर्तीने येऊन यंदाच्या दुष्काळावर मात करण्यासाठी दोन हात करावे असे आवाहन उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख अश्फाक तडवी व तुषार गोसावी ह्यांनी केले आहे.

पाण्याचे दुर्भिक्ष नजरेसमोर ठेवून जलसंधारण कामात खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे उन्हाळी सुटीत बहुतांश विद्यार्थी क्रीडा शिबिरांसह मनोरंजनपर क्लासेस ला प्राधान्य देतात. मात्र आजमितीला पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन प्रत्येकाने श्रमदानाला प्राधान्य दिले पाहिजे असेही आवाहन रणजितसिंग राजपूत यांनी केले आहे.

Add Comment

Protected Content