जळगाव प्रतिनिधी । गुरूनानक जयंतीनिमित्त वृत्त संकलनासाठी आलेल्या तरूणीचा अज्ञात चोरट्याने मोबाईल चोरून नेल्याची घटना मंगळवारी सुमारास आर.आर.विद्यालयाजवळ घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, भारतनगरातील रहिवासी नाजनीन शेख रईस ही गुरूनानक जयंतीनिमित्त आर.आर. विद्यालयजवळील गुरूद्वारा येथे वृत्त संकलनासाठी मंगळवारी दुपारी गेली होती. वृत्त संकलन केल्यानंतर नाजनीन ही दुचाकीजवळ आली असता तिला पर्समधील मोबाईल गायब झाल्याचे लक्षात आले. मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केला असता मात्र, कुणीतरी पर्समधून मोबाईल लांबविल्याची तिला खात्री झाली. अखेर सायंकाळी तिने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द तक्रार दाखल केली आहे.