Home Cities जळगाव जळगावातील महिला मंडळातर्फे पुरग्रस्तांना मदत

जळगावातील महिला मंडळातर्फे पुरग्रस्तांना मदत

0
52

mahila mandal

 

जळगाव प्रतिनिधी । येथिल सुरभि बहुउद्देशीय महिला मंडळ आणि बहुभाषिक ब्राह्मण महिला संघातर्फे नुकतीच पुरग्रस्तांसाठी 21
हजारांची अर्थिक मदत करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुरभि बहुउद्देशीय महिला मंडळ आणि बहुभाषिक ब्राह्मण महिला संघातर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,
जनकल्याण समितीचे दिपक घाणेकर ह्यांच्याकडे 21 हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा स्वाती कुलकर्णी,
सचिव मंजुषा राव, ज्योती भोकरडोळे यांच्यासह बहुभाषिक ब्राह्मण महिला संघाच्या संस्थापक अध्यक्षा सुधा खटोड उपस्थित होत्या.
तसेच रेवती शेंदुर्णीकर, विनया भावे, ज्योतिर्मयी संस्था, प्रा.रेखा मुजुमदार, कल्पना खटोड, प्रशांत ब्रह्मे, सुमित्रा राव, शुभांगी पापरिकर,
मोनाली राजहंस, सुरभि गीतावर्ग, माधुरी फडके आणि सुरभि कार्यकरिणी सदस्य व सभासदाचे सहकार्य लाभले.


Protected Content

Play sound