जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रातील कामगारांचे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे योजनाची प्रभावी पारदर्शक अंमलबजावणी होत नसल्यामुळे आज दि. 29 ऑगस्ट रोजी जिल्हा बांधकाम कामगार संघटनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यातील नोंदणीकृत व 2012 पासून आतापर्यंत नोंदणी असलेले कामगारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करीत कल्याणकारी मंडळाचा योजनांचे लाभाचे मागणी गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. यात शिष्यवृत्ती, प्रसूती अनुदान, विवाह अनुदान, पदविका अनुदान,पदवीत्तर अनुदान तसेच उच्च शिक्षण तसेच व्यवसायिक शिक्षणासह अनेक शैक्षणिक लाखांची मागणी अर्ज केले. सर्व लाभार्थी पात्र असताना 15 मार्च 2019 पूर्वीच देण्यात येणार होते. मात्र अद्यापपर्यंत एकाही कामगारांना आजपर्यंत वरील योजनेचा लाभ मिळाला नाही.
संघटनेच्या या आहेत मागण्या
सन 2017-18, 2018-19 या वर्षातील दाखल केलेले शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रसुती अनुदान, विवाह अनुदान, बेरोजगारी भत्ताची प्रकरणे त्वरित मिटवावे 15 दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना पंधरा दिवसाचे विद्यावेतन 4 हजार 200 रुपये त्वरित अदा करावे. जळगाव जिल्ह्यात सहा कामगार आयुक्त व सरकारी कामगार अधिकारी यासारखी महत्वाची पदे प्रभारी आयोजित कायमस्वरूपी नियुक्त करावे. बांधकाम साइटवर येऊन नोंदणी करणे कामी दाखला असलेल्या व दोन महिन्यांपासून नोंदणीच्या प्रतीक्षेत असलेल्या कामगारांनी त्वरित नोंदणी करून त्यांना ओळखपत्राचे वाटप करावे. बांधकाम कामगारांना घरकुल आवास योजनेअंतर्गत 10 लाखा रूपयांचे कर्ज व भरीव अनुदान द्यावे.
यांची होती उपस्थिती
यासह इतर मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जळगाव जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी या आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रकाश चौधरी, जनरल सेक्रेटरी विजय पवार, हनीफ शेख, ज्ञानेश्वर कुमार, भरत सैंदाणे, छगन सपकाळे, शेख नजीर शेख इब्राहिम, गोकुळ कोळी, भगवान कोळी, दिलीप सांगळे, विजय पवार, प्रवीण पाटील, अमोल पाटील यासह आदी उपस्थित होते.