जळगावात अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळला

 

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मटन मार्केट परिसरात अनोळखी ३५ वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील मटन मार्केट परिसरात एका ३० ते ३५ वर्षीय वयोगटातील अनोळखी तरूणाचा मृतदेह बुधवारी ८ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आढळून आला आहे. मयताच्या डाव्यापायावर जुन्या जखमांमुळे सेप्टीक झालेली आहे. दरम्यान अंगावर मळकट शर्ट, काळ्या रंगाचे जॅकेट, चेहरा गोल, केस काळे, दाढी वाढलेली असे वर्णन आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ हेमंत कळसकर यांच्या खबरीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस नाईक जयंत कुमावत करीत आहे.

Protected Content