जळगाव प्रतिनिधी । शहरातील एम.आय.डी.सी. पोलिस ठाण्याचे प्रमुख पो.नि. रणजीत शिरसाठ यांना नुकतेच मिलींद सामाजिक विकास मंडळ अंतर्गत अन्याय अत्याचार निर्मुलन समितीतर्फे प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले आहे.
समितीने या संदर्भात दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पो.नि. शिरसाठ हे पोलिस स्टेशनला आल्यापासून त्यांनी केलेली कामे अभिमानास्पद आहेत. शिरसाठ यांच्या कार्याचा व कामगिरीचा सार्थ अभिमान करून त्यांनी अशीच उत्तम कामगिरी यापुढेही करावी, अशा सदिच्छा समितीने व्यक्त केल्या आहेत. हे पत्र समितीच्या अध्यक्षा सुचित्रा महाजन आणि उपाध्यक्ष मुकेश सोनवणे यांनी दिले आहे.