जळगाव, प्रतिनिधी | येथील जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी उद्या (दि.३ ) विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या निवड प्रक्रियेसाठी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे हे पीठासन अधिकारी असतील.
महाविकास आघाडीकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांची उमेदवारी निश्चित मानण्यात येत असून उपाध्यक्षपदाची संधी शिवसेनेला देण्यात येणार आहे. भाजपाकडे ३३ सदस्य असून सेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसकडे ३२ सदस्य आहेत. यात भाजप व महाविकास आघाडीकडून त्यांचेच अध्यक्ष व उपाध्यक्ष बनतील असा दावा करण्यात येत आहे. भाजपने राष्ट्रवादीचा १ तर कॉंग्रेसचे ३ सदस्य संपर्कात असल्याचा दावा केला असून महाविकास आघाडीने भाजपचे ६ सदस्य संपर्कात असल्याचे म्हटले आहे. या दाव्या-प्रतिदावावरून प्रथमच जि. प. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड चुरशीची ठरणार आहे.
निवडणूक कार्यक्रम
दुपारी १ – नामनिर्दशन पत्र वितरण – स्वीकार
दुपारी ३ वा. अर्ज छाननी, माघारी, निवडीची घोषणा