जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महिला सर्वसाधारण आरक्षण निघाल्याने मिनी मंत्रालयात पुन्हा एकदा महिलाराज असेल असे स्पष्ट झाले आहे.
आज मंत्रालयात राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण काढण्यात आले. यात पुढील अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण महिला या वर्गवारीसाठी आरक्षण निघाले आहे. यामुळे झेडपीमध्ये पुन्हा एकदा महिलाच अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहे.
दरम्यान, आज राज्यातील विविध जिल्हा परिषदांमध्ये खालीलप्रमाणे आरक्षण निघाले आहे.
खुला (महिला) : जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर.
अनुसूचित जाती (सर्वसाधारण) : सोलापूर, जालना.
अनुसूचित जाती (महिला) : नागपूर, उस्मानाबाद.
अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) : नंदुरबार, हिंगोली.
अनुसूचित जमाती (महिला) : पालघर, रायगड, नांदेड.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) : लातूर, कोल्हापूर, वाशीम, अमरावती.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : ठाणे, सिंधुदुर्ग, सांगली, वर्धा, बीड.
खुला (सर्वसाधारण) : रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, अकोला, भंडारा.