जळगाव प्रतिनिधी | जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील एका कर्मचार्याला वारंवर गैरहजर राहण्यासह अन्य तक्रारींमुळे निलंबीत करण्यात आले आहे.
कार्यालयात सतत गैरहजर असलेल्या आणि वारंवार तक्रारींची मालिका सुरू असलेल्या जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील एका कर्मचार्याचे निलंबन करण्यात आले आहे. शिक्षण विभागातील पे युनिटमध्ये कार्यरत कनिष्ठ लिपिकाचे शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी तातडीने निलंबनाचे आदेश काढले.
प्राथमिक विभागातील पे युनिटमध्ये कार्यरत असलेल्या गणेश वाघमारे या कनिष्ठ लिपिकाबाबत कार्यालयातून अनेक तक्रारी होत्या. अनेक दिवसांपासून विनापरवानगी गैरहजर असल्याने शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी वाघमारे यांनी तातडीने निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत.