जळगाव, प्रतिनिधी । ओबीसींना पूर्ववत राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज आकाशवाणी चौकात युवक समता परिषदेने जोरदार घोषणाबाजी करून रास्ता रोको आंदोलन केले.
राज्यातील निवडणुकांमध्ये ओबीसी समुदायाला मिळणार्या आरक्षणावर गदा आलेली आहे. याचा निषेध करून पूर्ववत आरक्षण मिळावे या मागणीसाठी युवक समता परिषदेतर्फे आज शहरातील आकाशवाणी चौकात रास्ता रोको करून ओबीसी आरक्षण बचाओ आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, शालीग्राम मालकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी आकाशवाणी चौकात जोरदा र घोषणाबाजी करून ओबीसी समुदायाला आरक्षण मिळावे अशी मागणी केली.
दरम्यान, आंदोलन सुरू झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या गाडीतून त्यांना पुढील कारवाईसाठी पोलीस स्थानकात नेण्यात आले आहे. तर या आंदोलनामुळे शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबल्याचे दिसून आले.
खालील व्हिडीओत पहा युवक समता परिषदेचा रास्ता रोको
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/309117554188237