खंडणीसाठी चिठ्ठी लिहून देणारी महिला अटकेत

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कार जाळून खंडणीची मागणी करण्याच्या प्रकरणात एका महिलेचाही समावेश असल्याचे आढळून आले असून तिला अटक करण्यात आली आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, साईविहार कॉलनीत दोन कार पेटविणार्‍या सुरेश रमेश लहासे व राजू समाधान कोळी या दोघांना तालुका पोलिसांनी अटक केली असून त्या दोघांची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणा लहासे याच्या पत्नीचा देखील यात सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.

आनंद पाटील व हरिश वरुळकर यांची कार पेटवून १० लाखांची खंडणी मागितल्याच्या चिठ्ठ्या आशा लहासे हिने लिहिल्याचे तपासात समोर आले आहे. लहासे याच्या सांगण्यावरुन समाधान कोळी याने २९ जून रोजी मध्यरात्री दोन कार पेटवल्या होत्या. सुरेश लहासे हा आनंद पाटील यांच्याच घरात भाडेकरु म्हणून राहत होतो. त्यानेच घर मालकाची कार पेटवण्याचे कारस्थान रचले होते. तर आशा लहासे हिने धमक्यांच्या चिठ्ठ्या लिहल्या होत्या. यामुळे या महिलाचा सदर गुन्ह्यातील तपास निष्पन्न झाल्याने तिला सुध्दा अटक करण्यात आली आहे.

Protected Content