Home Cities जळगाव जळगावात वादळी वार्‍यासह अवकाळी जलधारा !

जळगावात वादळी वार्‍यासह अवकाळी जलधारा !

0
42

जळगाव प्रतिनिधी । एकीकडे दुपारी उकाडा वाढला असतांनाच सायंकाळी वादळी वारा व विजेच्या कडकडाटांसह अचानक जलधारा कोसळल्याने जळगावकरांना गर्मीतून काही काळ दिलासा मिळाला आहे. तर यामुळे अनेक भागांमधील वीज देखील गायब झाली आहे.

जळगावात येत्या काही दिवसांमध्ये विजेच्या कडकडाटांसह पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आला होता. मात्र आज दुपारी मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवला. तर सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

या अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून काही काळ का होईना जळगावकरांची मुक्तता होणार आहे. मात्र वादळी वार्‍यामुळे शहरातील अनेक भागांमधील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. तर जिल्ह्यातील काही ठिकाणी देखील अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त असून चाळीसगाव तालुक्यात गारपीट देखील झाल्याची माहिती मिळाली आहे.


Protected Content

Play sound