जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गिरणा धरणातून दीड हजार क्युसेक्स पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले असून यामुळे काठांवरील गावांना दिलासा मिळाला आहे.
सध्या अतिशय कडक उन्हाळा पडला असून अनेक ठिकाणी पाणी टंचाई जाणवत आहे. या अनुषंगाने गिरणा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी याची दखल घेऊन गिरणा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याचे निर्देश दिले होते.
या अनुषंगान पिण्याच्या पाण्यासाठी गिरणा धरणातून रविवारी दुपारी १ हजार ५०० क्युसेस पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी. तसेच आवर्तन पिण्यासाठीच असल्याने नदीकाठच्या शेतकर्यांनी आपले कृषीपंप बंद ठेवावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. या आवर्तनामुळे टंचाईग्रस्त गावांची पाण्यासाठीची भटकंती थांबणार आहे. पाण्याचे आवर्तन सुटल्यामुळे आता भर उन्हाळ्यात गिरणा नदीच्या पात्रात पाणी येणार असून नागरिकांनी याबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर या आवर्तनामुळे गिरणा नदीच्या दोन्ही काठांवर असणार्या गावांमधील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होणार आहे.