बांधकाम परवानगी हवी तर वृक्षारोपण करा : आयुक्तांचे आदेश

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहराच्या हद्दीत जर बांधकामाची परवानगी हवी असेल तर वृक्षारोपण करणे अनिवार्य असून आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी नगराचना विमागाला हे आदेश जारी केले आहेत.

जळगाव महापालिकेच्या हद्दीत कुणी घर बांधण्याचा विचार करत असेल तर त्यांच्यासाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे. यापुढे महापालिकेच्या हद्दीत बांधकाम परवानगी हवी असेल तर आधी वृक्षारोपण करावे लागणार आहे. एवढेच नव्हे तर, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पूर्णत्वाचा दाखल घेण्यापूर्वी लागवड केलेल्या वृक्षांचे संवर्धन केले आहे की नाही? याची तपासणी करण्यात येईल. या संदर्भात महापालिकेच्या आयुक्त विद्या गायकवाड यांनी नगररचना विभागाला आदेश दिले आहेत.

यासोबत पावसाळ्यामध्ये शहरात बांधकाम परवानगी घेण्यासाठी येणार्‍या विकासकांना अथवा नागरीकांना त्यांच्या बांधकामाच्या समोर दर पाच फुटावर वृक्षारोपण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भात नगररचना विभागाचे रचना सहायक यांना आयुक्त गायकवाड यांनी लेखी आदेश जारी केले आहेत.

Protected Content