जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी म्हणजेच ग.स.स सोसायटीचे उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे यांना धमकावल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ग. स. सोसायटीच्या निवडणुकीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता. लोकसहकारच्या दोन सदस्यांच्या पाठींब्यावर सहकार गटाने बाजी मारून अध्यक्षपदी उदय पाटील तर उपाध्यक्षपदी रवींद्र सोनवणे यांची निवड करण्यात आली होती. याप्रसंगी झालेल्या धुम्मसचे पडसाद अजूनही उमटत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ग.स. सोसायटीचे उपाध्यक्ष रवींद्र सोनवणेंना धमकी देण्यात आली आहे. ‘कार्यकारी मंडळाच्या सभेला या, तुमचे स्वागत करतो’ अशा शब्दात त्यांना धमकी देण्यात आली आहे. रविवारी सभा असल्याने संचालकांवर हल्ला होण्याची भीती तक्रार अर्जातून व्यक्त केली आहे.
कुमुद चांगरे यांनी उपाध्यक्ष रवींद सोनवणे यांना फोन करून ‘यापुढे तुम्ही ग.स. सोसायटीत कसे येतात ते पाहतो. कार्यकारी मंडळाच्या सभेला या तुमचे स्वागत करू’ अशी धमकी दिली आहे. या प्रकरणी रवींद्र सोनवणेंनी पोलीसात तक्रार दिली आहे. यामुळे आज होणार्या संचालक मंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.